शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४
गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४
राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त
आपल्या ह्रदयाचे वजन किती असते?
छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते. ते बरगड्यांमागे, दोन्ही फुप्फुसांच्यामध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते. अापल्या हृदयाचा आकार आपल्या मुठीएवढा असतो व वजन साधारणपणे 250 ते 350 ग्रॅम असते.
रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३
ए.पी.जे. अब्दुल कलाम
15-10-2023
ए.पी.जे. अब्दुल कलाम
अब्दुल कलामांना मिळालेले पुरस्कार व सन्मान
- १९८१ : पद्मभूषण
- १९९० : पद्मविभूषण
- १९९७ : भारतरत्न
- १९९७ : इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
- १९९८ : वीर सावरकर पुरस्कार
- २००० : रामानुजन पुरस्कार
- २००७ : किंग्ज चार्ल्स (दुसरा) पदक
- २००७ : ब्रिटन येथील वॉल्व्हरहॅम्प्टन विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी
- २००८ : सिंगापूर येथे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग ही मानद पदवी
- २००९ : अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे हूव्हर पदक
- २०१० : वॉटर्लू विद्यापीठाची डॉक्ट ऑफिंजिनिअरिंग ही मानद पदवी
- २०११ : न्य़ूयॉर्कच्या आयईईई या संस्थेचे सभासदत्व
- २०१२ : आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन ’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये कलाम दुसऱ्या क्रमांकावर होते.
- २०१५ सप्टेंबर : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.
सोमवार, १७ जुलै, २०२३
Learn with fun
मजेदार गेम खेळण्यासाठी वरिल Learn with Fun ला click करा.💫
मजेदार खेळातुन शिकू या.
Learn with Fun येथे click करा.
शुक्रवार, १४ जुलै, २०२३
चांद्रयान-3
चांद्रयान-3 दुपारी 2.35PM आकाशात झेप घेणार आहे,
आज शुक्रवार 14-7-2023 रोजी
चांद्रयान-3 दुपारी 2.35PM आकाशात झेप घेणार आहे, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठीक 2.15 पासून लॅपटॉप, संगणक, LED किंवा मोबाइलवर खालील लिंकला क्लिक करून Live प्रेक्षपण दाखवावे*
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
https://www.youtube.com/live/rknrtqZrTP4?feature=share
सोमवार, २० मार्च, २०२३
जागतिक चिमणीदिवस
*जागतिक चिमणी दिन* (World Sparrow Day) मार्च
२० हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जातो. पहिला जागतिक चिमणी दिवस हा २० मार्च २०१० रोजी साजरा करण्यात आला. आज चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चालल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय.
चिमण्यांच्या संवर्धनाचे उपायः
१.पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळीच्या जागांची निर्मिती करणे व त्यासोबतच धान्य सुद्धा उपलब्ध करून देणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे. आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.
२.पक्षांच्या वावरासाठी नैसर्गिक परिवास निर्माण करणे.
३.शेतीसाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे.
४.‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे.
५.चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे.
रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३
जरा डोके चालवा
प्रश्न 2 घाम आल्याने शरीराचे तापमान कमी का होते?
उत्तर : घाम हा घर्मग्रंथीतून स्रवून शरीराच्या त्वचेवर पसरतो. या घामाचे बाष्पीभवन होते. शरीरातील उष्णता शोषली जाते. जसजसा घाम सुकतो; तसतसे शरीराचे तापमान कमी होते.
जरा डोके चालवा
प्रश्न 1 अळू, कमळाच्या पानांच्या पृष्ठभागांवरून पाणी का ओघळून जाते?
उत्तर अळू आणि कमळ या जलीय वनस्पती आहेत. त्यांच्या पानांवर व लांब देठाप्रमाणे असलेल्या खोडांवर मेणचट पदार्थांचा पातळ थर असतो. त्यामुळे त्यावर पाणी शोषून घेतले जात नाही, तर ते ओघळून जाते.
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
विज्ञान शिकूया खेळातून
पुढील link ला click करा.आणि विज्ञान शिका जेदार खेळातून
विज्ञान शिकूया खेळातून
Click करा.Click करा
<iframe style="max-width:100%" src="https://wordwall.net/embed/85939f4a7c0240f796dd4a10c96d5c7d?themeId=21&templateId=69&fontStackId=0" width="500" height="380" frameborder="0" allowfullscreen></iframe>



























