🌑 चंद्रग्रहण म्हणजे काय?
चंद्रग्रहण तेव्हा होते, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मधे येते.
पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला चंद्र अंधुक, लालसर दिसतो.
हे केवळ पौर्णिमेच्या रात्री घडते.
🌍 चंद्रग्रहणाचे प्रकार
* खग्रास[ पुर्ण ] चंद्रग्रहण – चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत जातो.
* खंडग्रास [ अशंतः ] चंद्रग्रहण – चंद्राचा काही भाग सावलीत जातो.
दर महिन्याला चंद्रग्रहण का होत नाही?
चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या वेळी होते, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे सर्व एका रेषेत असतात. परंतु चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी आणि पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंतचे चक्र पूर्ण करण्यासाठी फक्त २९.५ दिवस लागतात, तरीही दरवर्षी सरासरी तीन चंद्रग्रहणे होतात.
आजचे चंद्रग्रहण
खग्रास चंद्रग्रहण
चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली आला तर त्या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात.
खग्रास स्थितीतही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. त्यामुळे या ग्रहणात चंद्राचा हा भाग थोडा गडद लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असं संबोधलं जातं.चंद्रग्रहण पाहताना डोळ्यांना इजा होत नाही (हे सूर्यग्रहणासारखे नाही).दुर्बीण किंवा डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहता येते.चंद्राचा आकार, रंग व बदल निरीक्षण करावे.




