आज दिनांक 28 फेब्रुवारी2024 रोजी जि.प.प्रा. शा.किणी शाळेत राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी श्री राठोडसर , श्री.लोमटेसर ,श्री आचार्यसर ,श्रीमती मंजुषा स्वामी,श्रीमती शोभा झाडे,श्रीमती बेबी नाईकनवरे ,अंजलीताई उपस्थित होते. राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त प्रयोगाचे प्रदर्शन भरवण्यात आले. शाळेतील पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांंनी सहभाग नोंदविला.राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त आयोजित विज्ञानसप्ताह डायट धाराशिव आयोजित विविध उपक्रम घेण्यात आले.यात विज्ञानकोडे ,प्रश्नमंजुषा ,विज्ञान चिञकला ,शास्त्रज्ञांची माहिती मुलाखत प्रयोग अशा विज्ञानसप्ताह साजरा करण्यात आला.घेतलेल्या उपक्रमांचे व आजच्या प्रयोगातुन पाच प्रयोग परिक्षण करुन काढण्यात आले. आज पहिली ते सातवीपर्यंतचे विद्यार्थांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला. मान्यवर व्यक्तींनी विविध स्पर्धेतील विद्यार्थीवर्गास बक्षिस वाटप करण्यात आले. श्रीमती मंजुषा स्वामी यांनी विद्यार्थांना विज्ञान दिनाची माहिती सांगितली.सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती शोभा झाडे यांनी केले.या प्रसंगी जोतिराम पवार व सौ.पवार या उपस्थित होत्या.याचबरोबर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.🔭📡🔬🦠🧪🔍
आजचे क्षणचिञे

























कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा