Red Spinning Frozen Snowflake

शनिवार, २० जून, २०२०

Digital योगदिन 21 june 2020


वाचण्यात आलेले

    🧎‍♀️*योगदिन 21जून*🧎‍♂️
उदया योगदिन घरीच योगासने करुन साजरे करु या.याकरिता video link दिलेले आहे.उदयाचा Digital Yogdin mobile वरिल योग्य असलेले योगासने पाहुन करुया.


     योगाबद्दल ---👇🏻
        सुख-दु:खामध्ये मनाचा समतोल राखणे म्हणजे योग किंवा आपल्या कर्माबद्दलची, कार्याची कुशलता म्हणजेच योग. थोडक्यात योग म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी यांना एकत्रित व संतुलितपणे राखण्याचे साधन व तंत्र म्हणजे योग. योगाचा मूळ उद्देश केवळ रोग किंवा आजार बरे करणे हा नसून ते होऊ नयेत म्हणून काळजी घेणे हाच आहे. हा संपूर्ण योग शंभर टक्के विज्ञानावर आधारलेला आहे. योगापाठीमागे फार  मोठे विज्ञान आहे. हे आपल्याला प्रात्यक्षिकातून व पूर्वजांच्या दाखल्यातून अभ्यासता येईल. हजारो वर्षाची परंपरा या योगाभ्यासाला आहे. बाराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण जरी आपण घेतले तरी आपल्याला हे लक्षात येतं की याच योगातील काही आसनांच्या व साधनेच्या जोरावर ज्ञानदेवांनी आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण केली होती, तेव्हा मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले होते. असे आपण ऐकतो, वाचतो यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नसून केवळ विज्ञान आहे. योगाच्या साधनेवरून मानवाला आपल शरीरामध्ये उष्णता निर्माण करता येते व निर्माण केलेली उष्णता कमी किंवा नियंत्रित करता येते. ऋतुमानानुसार हे मानवाला लाभदायक ठरते. उन्हाळ्यात   उष्णतेची दाहकता कमी व्हावी म्हणून शीतली प्राणायम करून शरीरात थंडावा निर्माण करता येतो तर हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव व्हावा म्हणून भस्त्रिका प्राणायम करून शरीरात त्वरित उष्णता निर्माण करता येते. अगदीच अलीकडील         स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपण इंग्रजांचे कायदे जसेच तसे घेतले. ते राबवत गेलो. त्यातील काही त्रुटी या योगाभ्यासाने निदर्शनास आल्या. त्यामध्ये असे वाचनात येते की एका आरोपीने योगातील दीर्घश्वासांचा सराव करून श्वासावर काही मिनिटांसाठी नियंत्रण मिळवले होते. त्याला फाशीची शिक्षा झाली होती. त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळाले होते. कायद्यानुसार निर्धारित वेळेत त्याला फासावर लटकविले गेले. निर्धारित वेळ संपली की त्याल फासावरून उतरवले गेले तरी देखील तो जिवंत होता. आता धकाधकीचे जीवनमान, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, असमाधानी वृत्ती, मन:शांतीचा अभाव यासारख्या अनेक कारणांनी ते घटत चालले आहे. केवळ औषध गोळ्यांच्या तात्पुरत्या आधारावर आपण फक्त जिवंत राहात चाललो आहोत. शुद्ध आणि दीर्घ हवा घेतली तर आपल्याला औषधे खावी लागणार नाही. हे योगातील विज्ञान आपण समजून घेतले पाहिजे.

२१ जूनच का?
👇🏻
२१ जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारतातील ५००० वष्रे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

*Digitalयोगदिन 2020* करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन हा डिजिटली साजरा करण्यात येणार आहे. कोवीड 19 या साथरोगामुळे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन एकत्रित आयोजित न करता घरातच योगदिन साजरा करावा ही विंनती.


👏👏
श्रीम मंजुषा स्वामी

Solar eclipse 21 June 2020




Solar Eclipse 21June 2020



How solar eclipse happens



Whenever the Earth, Sun, and the Moon form a straight line, we witness either a solar eclipse or a lunar eclipse depending on the position of the three bodies relative to each other. When the Moon comes between the Earth and the Sun, it casts a shadow on the Earth blocking the rays of Sun from directly reaching the planet, thus creating a solar eclipse on Earth. Based on the alignment and the relative distance between the three celestial bodies, there are three kinds of solar eclipses — total, partial, and annular. The June 21 event will be an annular solar eclipse.


Now look this video of information about solar eclipse on 21 June 👇🏻click and watch


look video

https://youtu.be/rInxT6SHvds


             

*सूर्यग्रहणजून२०२०*☀️

जून महिन्यातील दुसरे ग्रहण रविवार, २१ जून २०२० रोजी लागणार आहे. सन २०२० मधील पहिले सूर्यग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारताच्या काही भागात कंकणाकृती दिसणार असून, काही भागात ते खंडग्रास प्रकारात दिसणार आहे. गेल्या वर्षी २६ डिसेंबर २०१९ रोजी सूर्यग्रहण झाले होते. यानंतर लगेचच सहा महिन्यांनी सूर्यग्रहण होणार आहे. डिसेंबर महिन्याप्रमाणे जून महिन्यात होणारे सूर्यग्रहणही मोठे असणार आहे. या सूर्यग्रहणाचा भारतावर आणि जागतिक स्तरावरील अनेक देशांवर मोठा प्रभाव पडेल, असे ज्योतिषशास्त्र सांगते. ज्येष्ठ अमावास्येला असणारे हे सूर्यग्रहण तब्बल ५ तास ४८ मिनिटे चालणार आहे. करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव डिसेंबर महिन्यातील सूर्यग्रहणापासून सुरू झाला होता, त्याचा प्रभाव या सूर्यग्रहणानंतर आटोक्यात येण्याची शक्यता आहे, असे म्हणतात.जागतिक पातळीसह भारतातही अनेक ठिकाणी २१ जून २०२० रोजी लागणारे सूर्यग्रहण कंकणाकृती प्रकारात दिसेल. हे ग्रहण वलयाकार असेल. या ग्रहणात सूर्याचा ९९ टक्के भाग झाकला जाईल. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास सूर्य आणि पृथ्वीच्या मधे चंद्र आला की, सूर्यग्रहण घडते. त्यामुळे सूर्याचा संपूर्ण प्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही. जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते.देशाच्या काही भागातून हे सूर्यग्रहण कंकणाकृती पद्धतीने दिसेल. पैकी मसुरी, टोहान, चमोली, कुरुक्षेत्र, डेहराडून या भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल. त्याचप्रमाणे देशाच्या वेगवेगळ्या भागातून सूर्य कमी-अधिक प्रमाणात झाकल्याचे दिसेल. राजधानी दिल्लीत सूर्यग्रहणावेळी सूर्य ९५ टक्के झाकल्याचे दिसेल.


👏👏

श्रीम.मंजुषा स्वामी
**********************************************************