Red Spinning Frozen Snowflake

शनिवार, २० जून, २०२०

Digital योगदिन 21 june 2020


वाचण्यात आलेले

    🧎‍♀️*योगदिन 21जून*🧎‍♂️
उदया योगदिन घरीच योगासने करुन साजरे करु या.याकरिता video link दिलेले आहे.उदयाचा Digital Yogdin mobile वरिल योग्य असलेले योगासने पाहुन करुया.


     योगाबद्दल ---👇🏻
        सुख-दु:खामध्ये मनाचा समतोल राखणे म्हणजे योग किंवा आपल्या कर्माबद्दलची, कार्याची कुशलता म्हणजेच योग. थोडक्यात योग म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी यांना एकत्रित व संतुलितपणे राखण्याचे साधन व तंत्र म्हणजे योग. योगाचा मूळ उद्देश केवळ रोग किंवा आजार बरे करणे हा नसून ते होऊ नयेत म्हणून काळजी घेणे हाच आहे. हा संपूर्ण योग शंभर टक्के विज्ञानावर आधारलेला आहे. योगापाठीमागे फार  मोठे विज्ञान आहे. हे आपल्याला प्रात्यक्षिकातून व पूर्वजांच्या दाखल्यातून अभ्यासता येईल. हजारो वर्षाची परंपरा या योगाभ्यासाला आहे. बाराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण जरी आपण घेतले तरी आपल्याला हे लक्षात येतं की याच योगातील काही आसनांच्या व साधनेच्या जोरावर ज्ञानदेवांनी आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण केली होती, तेव्हा मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले होते. असे आपण ऐकतो, वाचतो यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नसून केवळ विज्ञान आहे. योगाच्या साधनेवरून मानवाला आपल शरीरामध्ये उष्णता निर्माण करता येते व निर्माण केलेली उष्णता कमी किंवा नियंत्रित करता येते. ऋतुमानानुसार हे मानवाला लाभदायक ठरते. उन्हाळ्यात   उष्णतेची दाहकता कमी व्हावी म्हणून शीतली प्राणायम करून शरीरात थंडावा निर्माण करता येतो तर हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव व्हावा म्हणून भस्त्रिका प्राणायम करून शरीरात त्वरित उष्णता निर्माण करता येते. अगदीच अलीकडील         स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपण इंग्रजांचे कायदे जसेच तसे घेतले. ते राबवत गेलो. त्यातील काही त्रुटी या योगाभ्यासाने निदर्शनास आल्या. त्यामध्ये असे वाचनात येते की एका आरोपीने योगातील दीर्घश्वासांचा सराव करून श्वासावर काही मिनिटांसाठी नियंत्रण मिळवले होते. त्याला फाशीची शिक्षा झाली होती. त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळाले होते. कायद्यानुसार निर्धारित वेळेत त्याला फासावर लटकविले गेले. निर्धारित वेळ संपली की त्याल फासावरून उतरवले गेले तरी देखील तो जिवंत होता. आता धकाधकीचे जीवनमान, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, असमाधानी वृत्ती, मन:शांतीचा अभाव यासारख्या अनेक कारणांनी ते घटत चालले आहे. केवळ औषध गोळ्यांच्या तात्पुरत्या आधारावर आपण फक्त जिवंत राहात चाललो आहोत. शुद्ध आणि दीर्घ हवा घेतली तर आपल्याला औषधे खावी लागणार नाही. हे योगातील विज्ञान आपण समजून घेतले पाहिजे.

२१ जूनच का?
👇🏻
२१ जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला. भारतातील ५००० वष्रे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.

*Digitalयोगदिन 2020* करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिन हा डिजिटली साजरा करण्यात येणार आहे. कोवीड 19 या साथरोगामुळे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन एकत्रित आयोजित न करता घरातच योगदिन साजरा करावा ही विंनती.


👏👏
श्रीम मंजुषा स्वामी

1 टिप्पणी:

**********************************************************