Red Spinning Frozen Snowflake

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

मराठी भाषा गौरवदिन


कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्तानं 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारनं घेतला. 

कवी कुसुमाग्रज

            मराठी साहित्यातील महान कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ मध्ये नाशिकमध्ये झाला होता. कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. विष्णू वामन शिरवाडकर यांना ‘कुसुमाग्रज’ या टोपणनावाने ओळखले जाते. त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि वंचितांचे स्वातंत्र्य यावर विपुल लेखन केले आहे. भारतीय साहित्यातील उत्कृष्ट नमुना म्हणून कुसुमाग्रज यांचे साहित्य मानले जाते.

                  मराठी भाषेतील साहित्यासोबतच त्यांनी मराठी रंगभूमीसाठी देखील महत्वपूर्ण योगदान दिले आहे. १९९१ मध्ये त्यांना पद्मभूषणसह इतर अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आज ही त्यांच्या साहित्यकृती या वाचकांना विपुल ज्ञान आणि प्रेरणा देतात. १० मार्च १९९९ मध्ये कुसुमाग्रज यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी नाशिकमध्ये निधन झाले.कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेसाठी मोठे योगदान दिले, त्यांच्या या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि मराठी भाषेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी २०१३ पासून २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

**********************************************************